Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rule Changes from 1 April : उद्या, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक अर्थविषयक नियम बदलणार आहेत.
Rules Changes from tomorrow 1 April 2023 : नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ची सुरुवात उद्यापासून होत असून नव्या वर्षासोबतच इन्कम टॅक्सशी संबंधित काही नवे नियम लागू होणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
कर मर्यादेत वाढ, नवीन टॅक्स स्लॅब आणि डेट म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमही बदलणार आहेत. एलपीजीचे नवे दर उद्या जाहीर होणार असून कारच्या किंमतीही वाढणार आहेत. सोन्याची विक्री करताना हॉलमार्क अनिवार्य असेल. ई-गोल्डवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जाणून घेऊया सविस्तर…
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. १ एप्रिल २०२३ पासून, नवीन कर प्रणाली आपसूकच लागू होणार आहे. मात्र, करदात्यांना जुन्या पद्धतीनं कर भरण्याचा पर्याय निवडता येणार आहे.
- नवीन नियमांनुसार ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. यापूर्वी ही सूट ५ लाखांपर्यंत होती. याशिवाय, नवीन करप्रणाली अंतर्गत १५.५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक पगारदार व्यक्तीला ५२,५०० रुपयांची थेट सूट (स्टँडर्ड डिडक्शन) मिळणार आहे. उद्यापासून हे नियम लागू होतील.
- सोन्याचे दागिने आणि संबंधित वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. १ एप्रिलपासून केवळ ६ अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. म्हणजेच उद्यापासून चार अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) असलेले दागिने विकता येणार नाहीत.
- देशभरातील महामार्ग आणि द्रूतगती मार्गांवर टोल टॅक्स वाढवला जाणार आहे. देशातील पहिला एक्स्प्रेस हायवेवर १ एप्रिलपासून १८ टक्के अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. दुसरीकडे, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरचा प्रवासही उद्यापासून महाग होणार आहे.
- NHAI ने टोल दरात सुमारे १० टक्के वाढ केली आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI द्वारे होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, २हजार रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.
- उद्यापासून कार खरेदी करणंही महागणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प आणि मारुती यांनी पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं नवीन सेडान कार, होंडा अमेझ कारही महाग होणार आहे. किंमतींमधील वाढ मॉडेलवर अवलंबून असेल.
- पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असलेल्या जीवन विमा पॉलिसी कराच्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळं प्रीमिअम वाढण्याची शक्यता आहे.
- भौतिक स्वरूपातील सोन्याचं इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) मध्ये रूपांतर केलं जाणार आहे. त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.डेट म्युच्युअल फंडांच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. डेट म्युच्युअल फंडांतील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर यापुढं टॅक्स लागणार नाही. केवळ शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर कर आकारणी होईल.
- एलपीजी सिलिंडरचे नवे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केले जातात. उद्या, १ एप्रिल रोजी या दरात बदल होणार आहेत.
Comments
Post a Comment