Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम Rule Changes from 1 April : उद्या, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक अर्थविषयक नियम बदलणार आहेत. Rules Changes from tomorrow 1 April 2023 : नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ची सुरुवात उद्यापासून होत असून नव्या वर्षासोबतच इन्कम टॅक्सशी संबंधित काही नवे नियम लागू होणार आहेत. ट्रेंडिंग न्यूज कर मर्यादेत वाढ, नवीन टॅक्स स्लॅब आणि डेट म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमही बदलणार आहेत. एलपीजीचे नवे दर उद्या जाहीर होणार असून कारच्या किंमतीही वाढणार आहेत. सोन्याची विक्री करताना हॉलमार्क अनिवार्य असेल. ई-गोल्डवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जाणून घेऊया सविस्तर… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. १ एप्रिल २०२३ पासून, नवीन कर प्रणाली आपसूकच लागू होणार आहे. मात्र, करदात्यांना जुन्या पद्धतीनं कर भरण्याचा पर्याय निवडता येणार आहे. नवीन नियमांनुसार ७ लाख रुपय